दिलवाले दुल्हनिया ले जायेंगेचे 700 आठवडे पूर्ण

March 13, 2009 6:11 PM0 commentsViews: 53

13 मार्चयश राज फिल्मचा दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हा सिनेमा एव्हरग्रीन ठरलाय. बॉलिवूडच्या प्रेमकथेचा टिपिकल फॉर्म्युला असणा-या या सिनेमाचे रेकॉर्ड मागून रेकॉर्ड होत आहे. मुंबईच्या मराठा मंदिर थिएटरमध्ये या सिनेमानं 700 आठवडे पूर्ण केलेत. 20 ऑक्टोबर 1995मध्ये रिलीज झालेला हा सिनेमा गेली 14 वर्ष मराठा मंदिरमध्ये सुरू आहे. मे 2005मध्ये सिनेमानं 500 आठवडे पूर्ण केले होते. तुझे देखा तो ये जाना सनम आणि मेहंदी लगा के रखना या गाण्यांची जादू आजही कायम आहे. याच सिनेमामुळे शाहरूख आणि काजोलची जोडी हीट झाली.

close