काँग्रेसचे खासदार राजेश मिश्रांना निवडणूक आयोगाची नोटीस

March 13, 2009 6:20 PM0 commentsViews: 4

13 मार्च वाराणसीनिवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी खासदार गोविंदा अडचणीत आलाय. त्यामुळे काँग्रेसपुढच्या अडचण वाढल्यात. त्यातच आता काँग्रेसच्या आणखी एका खासदाराला निवडणूक आयोगानं नोटीस बजावलीये. काँग्रेसचे वाराणसीमधले खासदार राजेश मिश्रा हेही काही जणांना पैसैे देताना आढळले. मिश्रा पैसे देत असतानाचं व्हिडिओ फुटेज प्रसिध्द झालं. होळीच्या दिवशी वाराणसीत दोन समुदायांमध्ये वाद झाला होता. त्यातल्या जखमींना मिश्रा शंभर आणि पाचशेच्या नोटा देताना दिसले. निवडणूक आयोगानं या फुटेजची दखल घेत मिश्रा यांना नोटीस बजावली.

close