काँग्रेसचा मेघालयमध्ये सरकार स्थापण्याचा निर्णय

March 13, 2009 6:25 PM0 commentsViews: 5

13 मार्च एकीकडे जागा वाटपावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत वाद सुरू असताना काँग्रेसने राष्ट्रवादीला मेघालयमध्ये धक्का देण्याचं ठरवलंय. दोन मंत्र्यांनी राजीनामा देत सरकारचा पाठिंबा काढून घेतलाय. हे दोघेही मंत्री अपक्ष आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचा पाठिंबा असलेलं डोंकुपर रॉय यांचं सरकार अल्पमतात निवडून आलं. मेघालय राज्यात सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसने आता सरकार स्थापनेचा दावा केला आहे. काँग्रेस सोमवारी बहुमत सिद्ध करणार आहे. साठ सदस्य असलेल्या मेघालय विधानसभेत राष्ट्रवादीप्रणीत मेघालय प्रोग्रेसिव्ह अलायन्स सरकारकडे 28 जागा आहेत.

close