केरळमधल्या युपीए आणि एनडीएच्या जागा वाटपाच्या वादाला पूर्ण विराम

March 13, 2009 6:29 PM0 commentsViews: 2

13 मार्च युपीए आणि एनडीए या आघाड्यांमध्ये मित्रपक्षांना रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केरळमध्ये सत्तारूढ डाव्या आघाडीतही फूट पडण्याची शक्यता होती. पण हाती आलेल्या माहितीनुसार हा वाद मिटला आहे. लोकसभेच्या जागावाटपावरून हा वाद सुरू झाला होता. सीपीआय पारंपारिक पोन्नाई मतदारसंघावर सीपीएमनं दावा सांगितल्यानं हा वाद सुरू झाला होता. पण पोन्नई मतदारसंघ सीपीआयला देण्याचं सीपीएमनं मान्य केल्यानंतर हा वाद मिटला. जागा द्या नाहीतर राज्यातल्या सर्व अठरा जागांवर निवडणूक लढवण्याचा इशारा सीपीआयनं दिला आहे. सीपीएमचे राज्य सरचिटणीस पिनाराई विजयन हेच या वादाला जबाबदार आहेत असा आरोप सीपीएमनं केला आहे. यासंदर्भातला अंतिम निर्णय 16 मार्चला होणार्‍या सीपीआयच्या बैठकीत होणार आहे. दरम्यान सीपीएमनं हा वाद मिटवण्यासाठी सीपीआयशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय.

close