पाकिस्तानमध्ये जिओ टीव्हीच्या प्रसारणावर बंदी

March 14, 2009 5:16 AM0 commentsViews: 1

14 मार्च पाकिस्तानमध्ये जिओ टीव्हीवर बॅन घालण्यात आला आहे. कोणतीही पूर्व सूचना न देता अनेक शहरांमध्ये जिओ टीव्हीचं प्रसारण बंद करण्यात आलंय. जिओ टीव्हीच्या प्रसारणावरून वाद झाल्यामुळे प्रसारणमंत्री शेरी रेहमान यांनी राजीनामा दिला आहे.परंतु पाकिस्तानचे अध्यक्ष झरदारी यांच्याशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचं समजतंय. दुस-या एका घटनेत पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतातली राज्यपालांची राजवट उठवायला राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी तयारी दाखवलीय. त्यामुळे नवाझ शरीफ यांच्या मुस्लीम लीगला या भागात सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा होईल. पाकिस्तानातली राजकीय अस्थिरता संपवण्यासाठी झरदारींना अमेरिकेनं 24 तासांची मुदत दिल्याची चर्चा आहे. लष्करानंही झरदारी यांना 16 तारखेपर्यंतची मुदत दिली होती. वाढत्या दबावामुळे झरदारी यांनी अखेर शरीफ यांच्या सर्व मागण्यांवर विचार करण्याची तयारी दाखवलीय. बडतर्फ सरन्यायाधीशांची पुन्हा नियुक्ती करण्याच्या मागणीवर वकिलांनी काढलेला लाँग मार्च आता इस्लामाबादमध्ये पोहचेल. त्यापूर्वी राजकीय तोडगा काढण्याचा इशारा अमेरिकेनं दिला आहे. दरम्यान सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय समझोता शक्य नसल्याची भूमिका शरीफ यांनी घेतलीय.

close