‘आमिरला जब्या आवडला’

March 10, 2014 8:58 PM1 commentViews: 3480

10 मार्च: बुरसटलेली समाजव्यवस्था, जाती-पाती यांच्याबाबत समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणार फँड्री सर्वांचा भावला. पण बॉलिवूडचा सुपरस्टार आणि मिस्टर परफेक्सनिस्ट आमिर खानलाही फँड्रीची भुरळ पडलीय. आमिर खाननं फँड्री पाहिला आणि तो दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि फँड्रीच्या बालकलाकारांना भेटला. फँड्री खूप छान सिनेमा आहे. तो मला खूप आवडला. दिग्दर्शन, कॅमेर्‍याचं काम खूपच मस्त झालंय. फँड्रीच्या टीमला माझ्या शुभेच्छा आहे अशी मराठीतून प्रतिक्रियाही आमिरने दिली.

  • Indian_first

    Ek Number… !!!

close