भारताची बॅटिंग कोसळली

March 14, 2009 5:31 AM0 commentsViews: 2

14 मार्च ऑकलंडभारत न्यूझीलंड दरम्यान ऑकलंडमध्ये सुरू असलेल्या वन डे मॅचमध्ये चांगल्या सुरुवातीनंतर भारतीय टीम बॅकफूटवर गेली. आणि भारताचे सर्व बॅट्समन149 रन्सवर आऊट झाले. सकाळी टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतल्यानंतर सेहवाग आणि गंभीर यांनी सुरुवात तर आक्रमक केली. आठव्या ओव्हरमध्येच त्यांनी टीमला 50 रन्सचा टप्पा ओलांडून दिला. पण फटकेबाजीच्या नादातच गंभीर आऊट झाला. त्यानंतर दहाव्या ओव्हरमध्ये सुरेश रैनाही मोठा शॉट खेळण्याच्या नादात आऊट झाला. स्कॉट स्टायरसने रैनाचा अप्रतिम कॅच पकडला. जम बसलेला सेहवागही त्यानंतर आऊट झाला आणि भारतीय टीम बॅकफूटवर गेली. सेहवागने 27 बॉल्समध्ये 40 रन्स केले. यात त्याने तीन सिक्स आणि तीन फोर मारले. पण जेकब ओरमच्या बॉलिंगवर मॅक्युलमकडे कॅच देऊन तो आऊट झाला.त्यानंतरही टॉप ऑर्डर कोसळतच गेली. युवराज 11, धोणी 9 आणि युसुफ पठाण शून्यावर आऊट झाले. त्यानंतर आलेल्या हरभजनसिंग 1, झहीर खान 5 आणि ईशांत शर्माने 3 रन्स केले. भारताची टीम 37व्या ओव्हरमध्ये आटोपली. जेसी रायडरने 3 तसंच ओरम आणि ब्रायन यांनी 2-2 विकेट मिळवल्या. पावसामुळे मॅच 43 ओव्हर्सची करण्यात आली होती.

close