मोदींच्या ‘चाय पे चर्चा’वर निवडणूक आयोग नाराज!

March 11, 2014 12:19 PM0 commentsViews: 977

chai pe charcha11 मार्च :  भाजपच्या नरेंद्र मोदींसाठीच्या प्रचारातील एक महत्त्वाचा कार्मक्रम ‘चाय पे चर्चा’ धोक्यात येण्याची शक्यता आहे. कारण निवडणूक आयोगाने या कार्यक्रमाद्वारे वाटण्यात येणार्‍या मोफत चहावर नाराजी व्यक्त केली आहे.

सोमवारी उत्तर प्रदेशच्या लखीमपूर जिल्ह्यात ‘मोदी के साथ चाय पे चर्चा’ कार्यक्रम सुरु असताना भाजपच्या काही कार्यकर्त्यांना नियमभंग केल्याने ताब्यातही घेण्यात आले. एलईडी स्क्रीनवर नरेंद्र मोदींची भाषणं ऐकवत लोकांना मोफत चहा वाटत असल्यानं कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं. स्थानिक प्रशासनाची अशा कार्यक्रमासाठी परवानगीही न घेतल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांवर आहे.

कोणतीही गोष्ट मतदारांना फुकट वाटणं ही एक प्रकारची लाचच असून त्याला परवानगी देता येणार नाही अशा शब्दांत उत्तर प्रदेशच्या निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकार्‍याने नाराजी व्यक्त केली आहे.निवडणूक आयोगाची चाय पे चर्चाच्या कार्यक्रमावर करडी नजर राहणार आहे.

close