‘नमो’चा जप करणे संघाच काम नाही – मोहन भागवत

March 11, 2014 2:04 PM0 commentsViews: 323

n06211 मार्च :   भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी अर्थात ‘नमो’चा जप करणे हे संघाचे काम नाही, असे म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघाचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना आगामी लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपसाठी काम करताना आपली मर्यादा न ओलांडण्याचे निर्देश दिले आहेत.

बंगळुरू येथील एका कार्यक्रमात बोलताना भागवत यांनी हे वक्तव्य केले. व्यक्तीपूजेवर आधारित प्रचारामध्ये सहभागी होऊ नका, असा इशारा त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. ‘आपण राजकारणात सहभागी नाही, त्यामुळे नमो – नमो करणे हे आपलं काम नाही. त्यामुळे आपले लक्ष्य गाठण्यासाठी आपण काम केले पाहिजे’, असं भागवत यांनी स्पष्ट केलं आहे.

येत्या निवडणुकीत भाजपसाठी प्रचार करतानाही संघानं आपल्या मर्यादा पाळल्या पाहिजेत, असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

close