छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ला,15 जवान शहीद

March 11, 2014 5:23 PM1 commentViews: 971

fewenxal attack 411 मार्च : छत्तीसगड येथील सुकमामध्ये नक्षलवाद्यांनी भीषण हल्ला केलाय. या भीषण हल्ल्यात 15 जवान शहीद झालेत. एका नागरिकाचाही मृत्यू झालाय. नक्षलवाद्यांनी सुकमाच्या जेरम घाटीमध्ये सीआरपीएफच्या शोधमोहिमेवर हल्ला केला.

नक्षलवादी आणि सीआरपीएफच्या जवानांमध्ये सोमवारपासून चकमक सुरू होती. जेरमघाटी आणि टोंगपाल यांना जोडणार्‍या तागपाडा इथं रस्त्याचं बांधकाम सुरू असताना नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला. छत्तीसगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सीआरपीएफ जवानांची टीम घटनास्थळी पोहचली तेव्हा नक्षलवाद्यांनी हल्ला केला.

नक्षलवाद्यांनी पहिला स्फोट घडवून आणला आणि त्यानंतर जवानांवर चौफेर गोळीबार सुरू केला. याच दरम्यान, जवानांची दुसरी तुकडी घटनास्थळावर पोहचली. नक्षलवाद्यांनी त्यांच्यावरही हल्ला चढवला. पहिल्या तुकडीमध्ये 40 जवान होते. तर दुसर्‍या तुकडीमध्ये 10 जवान होते. या तुकड्यांवर 200 पेक्षा जास्त नक्षवाद्यांनी हा हल्ला केलाय. या हल्ल्यात 20 जवान शहीद झाल्याची भीती व्यक्त होत आहे. आतापर्यंत 15 जणांचे मृतदेह सापडले आहे. या हल्ल्यात अनेक जवान जखमी झाले आहे. या हल्ल्याच्या नंतर नक्षलवादी एवढ्यावरच थांबले नाही. जवानांच्या मृतदेहांखाली प्रेशर बॉम्ब लावून ठेवले आहे. त्यामुळे बॉम्बनाशक पथकाला बोलवण्यात आलंय. एकाच वर्षात नक्षलवाद्यांनी दुसर्‍यांदा याच ठिकाणी हा भीषण हल्ला केलाय.

  • sunil

    Indian che government zople ahe……….he politik che lok tar sare chor ahet…..?

close