आयपीएलचे सामने भारतात होणार?

March 11, 2014 4:57 PM0 commentsViews: 2019

ipl 7 match11 मार्च : केंद्रीय गृहमंत्रालयाने आयपीएलला अंशतः हिरवा कंदील दाखवलाय. आयपीएल 7 च्या बहुतांश मॅच या भारतात घेण्यासाठी गृहमंत्रालयाने बीसीसीआयला परवानगी दिल्याचं सूत्रांकडून कळतंय.

नेटवर्क 18 ला मिळालेल्या माहितीनुसार निवडणुकांनंतर आयपीएल 7 च्या उर्वरीत मॅच भारतात घेण्यासंदर्भात बीसीसीआयने गृहमंत्रालयाकडे परवानगी मागितली होती. तशी परवानगी गृहखात्याने बीसीसीआयला दिल्याचं कळतंय. याअगोदर निवडणुकांदरम्यान आयपीएलला सुरक्षेअभावी गृहखात्याने परवानगी नाकारली होती.

पण एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मतदान पूर्ण होतंय आणि जिथे मॅच रंगतायत तिथे निवडणुका होऊन जातायत. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिल्याचं सूत्रांकडून कळतंय. त्यामुळे आयपीएलच्या जास्तीत जास्त मॅच आता या भारतात होणार आहेत.

close