पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय मान्य -अशोक चव्हाण

March 11, 2014 7:06 PM0 commentsViews: 976

11 मार्च : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना काँग्रेस लोकसभेची उमेदवारी देणार की नाही यावरून बरीच चर्चा आहे. यावर पक्षश्रेष्ठी म्हणतील तो निर्णय मला मान्य आहे, असं स्पष्ट करत अशोक चव्हाण यांनी परतीचे संकेत दिले आहे. आयबीएन लोकमतला त्यांनी खास मुलाखत दिलीय. कुणाला तिकीट द्यायचं आणि कुणाला नाही याची चर्चा मीडियाच जास्त करतंय, असंही अशोक चव्हाण म्हणाले. आदर्श घोटाळा हे माझ्याविरुद्ध रचलेलं षड्‌यंत्र आहे, असा दावा त्यांनी केला. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या औरंगाबादमधल्या सभेत स्टेजवर अशोक चव्हाण उपस्थित होते. यावरून बरीच चर्चा झाली. पण या सभेत राहुल गांधी यांच्यासोबत स्टेजवर असण्याचा निर्णय पक्ष नेतृत्वाचा होता असा खुलासाही चव्हाण यांनी केला.

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांची ही सविस्तर मुलाखत तुम्ही पाहू शकता, आज संध्याकाळी साडे सात आणि रात्री 11.30 वाजता…

close