मलेशियन विमान मलाक्काच्या सामुद्रधुनीत सापडले?

March 11, 2014 8:45 PM0 commentsViews: 10002

malshiya air11 मार्च : बेपत्ता झालेलं मलेशियन एअरलाईन्सचं विमान सापडल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मल्लाकाच्या सामुद्रधुनीत हे विमान पडलं असण्याची शक्यता आहे.

मलेशियाच्या लष्करी सूत्रांनी ही माहिती दिल्याचं वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलंय. शोध पथकाच्या रडारवर विमानाचे अवशेष दिसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

दरम्यान, हे विमान बेपत्ता होण्यामागे अतिरेकी घातपात असण्याची शक्यता अतिशय धूसर दिसते अशी माहिती इंटरपोलनं दिली आहे. गेल्या चार दिवसांपासून मलेशियन एअरलाईन्सचे हे विमान बेपत्ता आहे. याचा शोध घेतला जात आहे पण अजूनही या विमानाचा शोध लागू शकलेला नाही. या विमानामध्ये 239 प्रवाशी आणि कर्मचारी होते. हे सर्वजण वाचली असलण्याची शक्यता कमी आहे.

कोटा भारूनंतर या विमानाने आपला मार्ग बदलला आणि ते मलाक्काच्या सामुद्रधुनीवरून प्रवास करू लागले असं लष्कराचं म्हणणं आहे. हे विमान शनिवारी क्वालालंपूरहून बिजिंगच्या दिशेनं निघाले होते त्यानंतर ते बेपत्ता झाले.

close