गारपीटग्रस्त भागांची पाहणी

March 11, 2014 8:51 PM0 commentsViews: 267

11 मार्च : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली. आधी त्यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या काझीकणबस गावातल्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी होटगी गावातल्या परिस्थितीची पाहणी केली. मात्र त्यांनी नुकसान भरपाई संदर्भातल्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर दिलं नाही. त्यानंतर ते उस्मानाबाद जिल्ह्यातल्या माळुंब्री, मंगरूळ या ठिकाणच्या गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम, पालकमंत्री पतंगराव कदम हेही होते. इथं मात्र त्यांनी गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मदत करण्यासंबंधी माहिती दिली. मदत देण्यासाठी निवडणुक आयोगानं परवानगी दिली असून येत्या 3 दिवसांत मंत्रिमंडळाची बैठक घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

close