10 हजार भरा केजरीवालांसोबत जेवण करा !

March 11, 2014 9:44 PM1 commentViews: 2495

denar kejriwal11 मार्च : लोकसभा निवडणुकीत मतदारराजाला खुश करण्यासाठी आम आदमी पार्टीने नामी शक्कल लढवली आहे. आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या 13 तारखेपासून होणार्‍या विदर्भ दौर्‍यानिमित्त ‘डिनर विथ केजरीवाल’ हा निधी संकलन कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय.

10 हजार रुपये भरून अरविंद केजरीवाल यांच्यासह जेवण करता येणार आहे. हॉटेल टूली इंटरनॅशनल इथं 14 मार्च रोजी 150 जणांची केजरीवाल यांच्यासोबत भोजनाची व्यवस्था करण्यात आलीये.

आम आदमी पार्टी भ्रष्ट कॉर्पोरेटकडून निधी घेत नाही तर अशा चांगल्या मार्गाने निवडणुकीसाठी निधी जमवत असल्याचं आपच्या नेत्या अंजली दमानिया यांनी सांगितलं.

विशेष म्हणजे या अगोदर भाजपने ‘नोट फॉर व्होट’ असं अभियान राबवलं होतं. त्याच धर्तीवर आपने एक पाऊल पुढे टाकत थेट ‘डिनर विथ केजरीवाल’ निधी संकलन कार्यक्रम हाती घेतला आहे.

  • Deep Heart

    निव्वळ मूर्खपणा …!!! “आप”कडून खूप अपेक्षा असताना त्यांनी हा कार्यक्रम करणे हे कितपत योग्य आहे हे आता लोकांनीच ठरवावे .. कारण इथे “आम-आदमी” च्या खिशात १० रुपये नाहीत वडापाव खायला आणि ह्यांच्यासोबत १०,००० रुपये देऊन भोजन आनंद लुटण्यात कोणालाच रस नाहीये .. :(

close