मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, हिंमत धरा- राज ठाकरे

March 12, 2014 1:10 PM0 commentsViews: 11172

raj thackrey with farmers12 मार्च :  गारपीट आणि अवकाळी पावसामुळे मराठवाड्यात शेतीचे प्रचंड नुकसान झालं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे या नुकसानग्रस्त भागातील शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी आज लातूर, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी लातूर जिल्ह्यातल्या मसलगा शिवारात गारपीटग्रस्त शेतकर्‍यांची भेट घेतली. ‘मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, हिंमत धरा बाकी मी बघतो’, अशाप्रकारचं आवाहन त्यांनी शेतकर्‍यांना केलं. गारपिटीमुळे झालेलं नुकसान सहन न झाल्यानं काही शेतकर्‍यांनी आत्महत्याही केल्यात.

‘शेतकर्‍यांनो तुम्हाला हात जोडून विनंती आत्महत्या करुन नका ,हिंमत धरा बाकी मी बघतो’ अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शेतकर्‍यांना आवाहन केल. राज ठाकरे आज गारपिटीचा दौरा करत आहेत लातूर जिल्ह्यातल्या मसलगा शिवारात त्यांनी गारपीटग्रस्त शेतकर्‍यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला . राज ठाकरे लातूर , बीड आणि मग औरंगाबाद असा दिवसभराचा दौरा करणार आहेत.

close