गारपीटग्रस्त शेतकर्‍यांची व्यथा

March 12, 2014 1:56 PM1 commentViews: 347
 • pravin sapkal

  उत्तर महाराष्ट्रातल्या कांद्यापाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रातल्या
  डाळिंबांचेही भाव गारपिठीमुळं गडगडले आहेत… लाखो रुपये खर्चून दुष्काळात जगवलेल्या
  बागा आता गारपिटीनं जमिनदोस्त झाल्या आहेत….तर उरल्या-सुरल्या फळांना तडे गेले आहेत….त्यामुळं
  शेतक-यांकडून कवडीमोल भावानं डाळिंबांची विक्री सुरु आहे….

  गेल्या पंधरा दिवसापासून सोलापूर जिल्ह्यातल्या शेतीपिकांना गारपिटीचा
  फटका बसतोय..दिवसभर लख्ख उन्ह..पुढं दिस मावळतीला झुकला की आभाळ असं भरुन येत अन् मग
  सुरु होतं निसर्गाचं तांडव….सुसाट्याचा हा असा वादळी वारा…मग पाऊस अन् गारपिठ…या
  वातावरणात मग पिकं कशी तग धरुन राहणार….तीही मग अशा माना टाकतात….तर फळ तडकतात….

  खराब झालेली डाळिंब निवडणारा हा आहे कुरुलचा युवा शेतकरी प्रवीण
  पाटकर… प्रवीणनं नॅशनंल हाँर्टीकल्चर बोर्डाकडून कर्ज काढून आठ एकरावर डाळींबाची
  बाग लावलीय….बागही चांगली आली…त्यामुळं आपली डाळींब आखाती देशांत पाठवण्याची स्वप्न
  पाहीली …मात्र आठवडाभरात झालेल्या गारपिटीनं आता त्याचं स्वप्न हवेतच विरलंय… त्याही पुढं
  जावून आज व्यापारी मागेल त्या दराला डाळिंब विकण्याची नामुष्की प्रवीणवर आलीय….

  आधी दुष्काळ …मग गारपिट अन् आचारसंहितेमुळं सरकारच्या
  मदतीला होणारा विलंब अशा कोडींत राज्यातला शेतकरी अडकलाय…म्हणून मिळेल ते पदरात पाडून
  घेण्याची त्याची मानसिकता झालीय…

close