नेत्यासाठी काय पण, ‘आप’च्या कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी

March 12, 2014 5:05 PM5 commentsViews: 1528

235kejri in mumbai12 मार्च : आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल हे जिथे जातात तिथे आपली छाप सोडतात. आपल्या मुंबई दौर्‍याला केजरीवाल यांनी एकदम हटके सुरूवात केली. साधारपणाचा टेंभा मिरवणारे केजरीवाल मुंबईत थेट विमानाने दाखल झाले आणि विमानतळावरुन रिक्षाने प्रवास करत अंधेरी लोकल स्टेशनवर पोहचले. तिथून लोकलने प्रवास करून चर्चगेट गाठले.

या प्रवासात आपच्या कार्यकर्त्यांनी कमालीची हुल्लडबाजी केली. अंधेरी स्टेशनवर जमलेल्या गर्दीला कार्यकर्त्यांनी धक्काबुक्कीही केली एवढेच नाही तर चर्चगेटवर सुरक्षेसाठी लावण्यात आलेली मेटल डिटेक्टर्स ही पायदळी तु़डवत कार्यकर्ते पुढे गेले पण कार्यकर्त्यांचे ‘हिरो’ केजरीवाल यांना याबद्दल काही घेणं देणंच नव्हतं. प्रसारमाध्यमांच्या कॅमेर्‍यांना हात उंचावत केजरीवाल आपच्या कार्यलयात पोहचले.

दिल्लीचे तख्त सोडल्यानंतर अरविंद केजरीवाल आज (बुधवारी) मुंबईच्या दौर्‍यावर आहे. सत्ता सोडल्यानंतर केजरीवाल पहिल्यांदाच मुंबईत दाखल झाले. आज सकाळी सव्वादहाच्या सुमाराला अरविंद केजरीवाल मुंबई एअरपोर्टवर दाखल झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत आपच्या सदस्य प्रीती मेननही यावेळी एअरपोर्टवर उपस्थित होत्या.

आपल्या नेत्यांच्या स्वागतासाठी ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी विमानतळावर एकच गर्दी केली होती. पण आपल्या नेत्याच्या स्वागतासाठी कार्यकर्त्याचे भान हरपले. केजरीवाल विमानतळावरुन रिक्षाने अंधेरी स्टेशनवर पोहोचले. केजरीवाल यांनी अंधेरी ते चर्चगेट असा लोकलने प्रवास केला. चर्चगेटवर केजरीवाल यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे तिथे प्रवाशांसोबत धक्काबुक्की झाली. चर्चगेटवरून बाहेर पडत असताना कार्यकर्त्यांनी स्टेशनवरील मेटल डिटेक्टर्स पायदळी तुटवत बाहेर पडले. कार्यकर्त्यांच्या हुल्लडबाजीमुळे मात्र सर्वसामान्य मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागला.

 • Sham Dhumal

  भ्रष्टाचारविरोधी आंदोलणामुळे केजरीवाल यांच्यावर लोकांचा विश्वास बसला होता. परंतु दिल्लीचे मुख्यमंत्री बनल्यानंतर
  ते आता “आम” आदमी न राहता ६० वर्षे सत्तेत असलेल्या “आम” नेत्यांच्यासारखेच राजकारनी बनले आहेत.

 • Sham Dhumal

  केलेल्या घोषणा पूर्ण करण्याची संधी असतानासुध्दा केजरीवाल मिळालेली सत्ता सोडून का पळाले?

 • Sham Dhumal

  लोकांचा केजरीवाल यांच्यावर विश्वास होता म्हणुन दिल्लीत “आप” चे २८ आमदार निवडुन आले. परंतु त्यांनी मतदारांना धोका दिल्यामुळे आता २ आमदारसुध्दा निवडुन येणे अशक्य आहे.

 • Sham Dhumal

  स्वत:च कायदे तोडणारे केजरीवाल जनतेला न्याय कसा देणार?

 • Sham Dhumal

  कांही दिवस मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसल्यानंतर केजरीवाल कॉंन्ग्रेसचा भ्रष्टाचार कसा विस्रून गेले?

close