ममतादीदी को ‘गुस्सा क्यू आया’ !

March 12, 2014 6:18 PM0 commentsViews: 2236

23462462mamata and anna12 मार्च : ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला पाठिंबा जाहीर केला त्यानंतर आज पहिल्यांदाच ममतादीदी शक्तीप्रदर्शनसाठी मैदानात उतरल्या पण अण्णांनी या सभेकडे पाठ फिरवल्यामुळे ममतादीदी चांगल्याच संतापल्या. अण्णांच्या सांगण्यावर घरदार सोडून, आपली कामं बाजूला टाकून आपण रॅलीसाठी आलोत. ही रॅली आमच्या पक्षाची नव्हती तरीही मी इथे आले अशी संतप्त प्रतिक्रिया ममतादीदींनी दिली.

दिल्लीत रामलीला मैदानावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शक्तीप्रदर्शनासाठी रॅलीच आयोजन केलं पण या रॅलीला अण्णा हजारे गैरहजर राहिले. अण्णांनी पाठिंबा दिल्यानंतर खरंतर ही पहिलीच रॅली होती आणि याच रॅलीत अण्णांनी जाणं टाळलं.

सभेच्या अगोदर ममतांचे जवळचे सहकारी मुकुल रॉय यांनी महाराष्ट्र सदनात जाऊन अण्णांची भेट घेतली. पण तब्येतीचं कारण देत अण्णांनी रामलीलावर जाणं नाकारलं. दरम्यानच्या काळात अण्णांनी त्यांच्या जवळच्या व्यक्तींना रामलीलावर पाठवलं होतं आणि 3000 जणांपेक्षा जास्त लोक नाहीत, हे कळल्यानंतर रामलीलावर न जाण्याचा निर्णय अण्णांनी घेतला, असं सूत्रांकडून कळतंय.

अण्णा न आल्यामुळे ममतादीदी चांगल्याच संतापल्या. अण्णांच्या सांगण्यावर आपण घरदार सोडून हातची कामं बाजूला टाकून आपण इथे आलोत. रामलीला मैदानावर जेव्हा सभा होते तेव्हा प्रचंड गर्दी होते. आम्ही जर ठरवलं असतं तर अशी गर्दी आम्हीही खेचून आणली असती अशी नाराजी ममतादीदींनी व्यक्त केली.

close