आयपीएलचा शुभारंभ युएईमध्ये, समारोप भारतात !

March 12, 2014 7:04 PM0 commentsViews: 1284

ipl 7 uae12 मार्च : आयपीएलचे सामने भारतात होणार की नाही यावर सुरू असलेल्या चर्चेला बीसीसीआयने पूर्णविराम दिलाय. 16 एप्रिल ते 1 जून दरम्यान यावर्षी आयपीएल स्पर्धा 3 देशांमध्ये खेळवली जाणार आहे. आयपीएलचा शुभारंभ युएईमध्ये होणार आहे तर सांगता भारतात होणार आहे.

बीसीसीआयनं यासंदर्भात अधिकृच घोषणा केली आहे. आयपीएलचा पहिला हिस्सा युएई आणि बांगलादेशमध्ये खेळवला जाईल. 16 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान मॅच युएईमध्ये खेळवल्या जातील. तर 1 मे ते 12 मे दरम्यान स्पर्धा बांगलादेशमध्ये रंगणार आहे.

जर केंद्रीय गृहमंत्रालयानं या काळात मॅच भारतातच, जिथे निवडणुका पार पडल्यात तिथे खेळवायला परवानगी दिली तर आयपीएल युएईनंतर 1 मेला थेट भारतात परत येईल. पण जर ही परवागी मिळाली नाही तर स्पर्धा बांगलादेश मध्ये होईल. 13 मेपासून आयपीएलच्या दुसरा भाग भारतात पार पडेल असंही बीसीसीआयनं स्पष्ट केलंय. त्यामुळे आयपीएलचा तिढा अखेर आता सुटलाय.

close