काँग्रेसच्या नेत्यांचं निवडणूक ‘नको रे बाबा’ !

March 12, 2014 10:42 PM0 commentsViews: 2615

Image p_chidambaram_300x255.jpg12 मार्च : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस या देशातल्या सर्वात जुन्या पक्षाला वेगळीच चिंता सतावत आहे. काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते निवडणूक लढवायला उत्सुक नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. पी. चिदंबरम, मनिष तिवारी, जयंती नटराजन, सचिन पायलट यांची लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नाहीय.

त्याऐवजी चिदंबरम यांची राज्यसभेवर जाण्याची इच्छा आहे. आणि लोकसभेचं तिकीट आपला मुलगा कार्ती चिदंबरमला शिवगंगामधून मिळावं यासाठी ते आग्रही आहेत. सचिन पायलट अजमेरमधून निवडणूक लढवायला उत्सुक नाहीत. अजमेरची जागा मो.अझरुद्दीनला मिळण्याची शक्यता आहे.

जयंती नटराजन यांना पक्षानं निवडणूक लढवायला सांगितलंय. पण त्यांचीही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची इच्छा नसल्याचं समजतंय. विशेष म्हणजे, राहुल गांधींनी ज्येष्ठ नेत्यांना निवडणूक लढवण्यास सुचवलेलं असले तरी आखाड्यात उतरण्याचं धाडस नेते करत नाहीय. विधानसभा निवडणुकीत पाच राज्यात झालेला पराभव आणि वेगवेगळ्या सर्व्हेमधून काँग्रेस पिछाडीवर असलेल्या चित्रामुळे काँग्रेसच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे.

काँग्रेस नेत्यांच्या या भूमिकेमुळे काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित ?

  • - काँग्रेसच्या सद्यपरिस्थितीमुळेच या मंत्र्यांना पराभवाची भीती वाटतेय का?
  • - ज्येष्ठ नेत्यांना राहुल गांधींची कार्यपद्धत मान्य नाही, असा याचा अर्थ काढायचा का?
  • - तरुणांना संधी देण्यासाठी ज्येष्ठ मंत्र्यांनी स्वत:हून माघार घ्यावी का?
close