अस्मानी संकटामुळे बळीराजा हवालदिल

March 13, 2014 2:33 PM0 commentsViews: 85

13 मार्च :  प्रवीण मुधोळकर,  नागपूर

आधीच संकटात असणारा विदर्भातला शेतकरी वादळी पाऊस आणि गारपीटीमुळे उद्धस्त झाला आहे. विदर्भात लाखो हेक्टर संत्रा, गहू, ज्वारी, कापूस आणि हरभर्‍याचं नुकसान झालं आहे.

गारपीटीमुळे धांडे याच्या शेतातला सात लाख रुपये किमतीचा संत्रा, गहू आणि कापूस वाया गेला. वादळी वार्‍यामुळे संत्र्यांची शेकडो झाडेच उन्मळुन पडली आहेत. त्यामुळे आता त्यांना चिंता सतावतेय ती पुढच्या पाच वर्षांची.

शेतकरी आत्महत्यांमुळे चर्चेत आलेल्या या भागात आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांची मुलेही या नुकसानीमुळे निराश झाली आहेत.

गेल्या साठ वर्षात अशा प्रकारच्या गारपीटीचे संकट शेतकर्‍यांनी पहिल्यांदाच अनुभवले आहे. या गारपीटीतून सावरण्यासाठी सरकारन मदतीसोबत कर्जवसूलीला थोडी मुदतवाढ द्यावी एवढीच या शेतकर्‍यांची मागणी आहे.

close