पुणे-सातारा महामार्गाच्या सहापदरी रत्याचं काम लांबणीवर?

March 13, 2014 3:43 PM0 commentsViews: 665

highwayfgxdfx lane 13 मार्च :  पुणे- सातारा महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामाला आणखी 3 वर्षं उशीर होणार शक्याता आहे. दिलेला कालावधी वाढवून द्या, अशी मागणी या कामाचे ठेकेदार रिलायन्स इन्फ्रा कंपनीने केली आहे. विशेष म्हणजे काम रखडल्याचं खापर रिलायन्सनं नॅशनल हायवे ऍथॉरिटीवर फोडलं आहे.

पुण्यातील कर्वेनगर कोथरूड भागातून हिंजवडीला कामाकरता जाणार्‍या नागरिक संजीवनी महाजन यांनी माहितीच्या अधिकारात माहीती मागवली, त्यात कामाला विलंब होत असल्याचे उघड झालं. सजग नागरिक मंचने हे काम अर्धवट असल्याने या मार्गावरील टोलआकारणी ताबडतोब बंद करावी कारण दरवर्षी 10 टक्के टोल रक्कम वाढवली जाते याला आक्षेप घेतला आहे.

close