तापमान बदलामुळे जर्मन रेल्वे वारंवार बंद पडतात

March 14, 2009 11:26 AM0 commentsViews: 6

14 मार्च मुंबईमुंबईतल्या चाकरमान्यांना खूश करण्यासाठी आणलेल्या जर्मन रेल्वे गाडया वारंवार बंद पडण्याचा प्रॉब्लेम पश्चिम रेल्वेच्या लक्षात आला आहे. या जर्मन लोकलमध्ये प्रामुख्यानं दोन प्रकारचे प्रॉब्लेम आढळून येत आहेत. एक म्हणजे मोटार फेल्युअरचा प्रॉब्लेम आणि दुसरा म्हणजे सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम. तापमान वाढल्यानं या लोकलच्या चाकांमध्ये असणा-या बॉलबेअरिंग वितळतात. त्यामुळे व्हील लॉक होतात आणि गाडी जागेवरच थांबते. पश्चिम रेल्वेमार्गावर 17 लोकल धावतात यामध्ये असणा-या 272 मोटार्सपैकी 56 मोटर्स बदलल्या असून, बाकीच्या मोटार्स एक एप्रिल पासून बदलणार असल्याचं अधिका-यांनी सांगितलं.

close