मनसे मुंबईतल्या सहाही जागा लढवणार

March 14, 2009 1:01 PM0 commentsViews:

14 मार्च मुंबईविनोद तळेकर मनसेच्या मुंबईमधल्या पदाधिका-यांची बैठक रवींद्र नाट्य मंदिरात पार पडली. या बैठकीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत पक्षाची ध्येयधोरणं काय असावीत याबाबत पदाधिका-यांना मार्गदर्शन केलं. येत्या निवडणुकीत मनसे राज्यभरात जास्तीत जास्त जागांवर आपले उमेदवार उभे करणार असून मुंबईतल्या सहाही जागा लढवण्याचा निर्णय मनसेनं घेतला आहे. मनसे ज्या जागा लढवणार आहेत त्यांची यादी येत्या दोन दिवसात जाहीर करण्यात येईल असं पक्षातर्फे सांगण्यात आलं आहे.

close