‘यशवंतराव चव्हाण’ सिनेमाचं प्रीमियर

March 13, 2014 6:52 PM0 commentsViews: 706

13 मार्च : दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या ‘यशवंतराव चव्हाण बखर एका वादळाची’ या सिनेमाचा प्रीमियर मुंबईत नुकताच झाला. प्रीमियरला अनेक दिग्गज नेतेमंडळी उपस्थित होते. कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर.आर.पाटील, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी या प्रीमियरला हजेरी लावली होती. याशिवाय सिनेमाचे सर्व कलाकार आणि मराठी इंडस्ट्रीमधले कलाकारही उपस्थित होते. सिनेमा उद्या सगळीकडे रिलीज होतोय.

close