आता उद्धव ठाकरे नार्वेकरांमुळे नाराज?

March 13, 2014 10:24 PM1 commentViews: 3271

sdr udhav and narvekar13 मार्च : शिवसेनेचे नेते राहुल नार्वेकर यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीतून माघार घेतलीय. त्यामुळे आता विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 9 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

पण पक्षनेतृत्वाला माहिती न देता राहुल नार्वेकरांनी अर्ज मागे घेतलाय. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाराज आहेत. त्यांनी परस्पर काँग्रेस राष्ट्रवादीशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

विशेष म्हणजे नितीन गडकरी आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीमुळे महायुतीत वादळ उठलं होतं. त्यावेळी भाजपमध्ये कॅम्युनिकेशन गॅप आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र आता उद्धव ठाकरे यांना न सांगताच नार्वेकरांनी माघार घेतलीय त्यामुळे आता शिवसेनेतच कॅम्युनिकेशन गॅप असल्याची चर्चा सुरू झालीय.

  • Paras Mutha

    लोकसभा पण बिनविरोध होऊन जाऊद्या !!!

close