भाजपकडून पूनम महाजन यांना तिकीट

March 13, 2014 10:23 PM0 commentsViews: 2787

punam mahajan13 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून पुण्यातून प्रकाश जावडेकर यांच्या नावाची चर्चा आहे तर उत्तर पश्चिम मुंबईत पूनम महाजन, सोलापूरमध्ये शरद बनसोड यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित झालंय.

गिरीश बापट आणि अनिल शिरोळे ही दोन नावं पुण्यासाठी डोळ्यासमोर असल्याचं एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलं होतं. पण आता राज्यसभेची जागा आरपीआयचे नेते रामदास आठवलेंसाठी सोडल्याने प्रकाश जावडेकरांनीही आपलं घोडं पुढं दामटलंय.

बापट गडकरी गटाचे तर शिरोळे मुंडे गटाचे मानले जातात यामुळे भाजपपुढंही निवडीचा पेच आहेच. शिवाय मनसेनं दीपक पायगुडेंची उमेदवारी जाहीर केल्यानं भाजपपुढे तगडं आव्हान उभं ठाकलंय.

मराठा -ब्राम्हण अशीही जातीची समीकरणं काँग्रेस आणि भाजपकडून तपासली जात आहे. विशेषत: महाराष्ट्रातल्या पुणे, नंदूरबार आणि लातूर या जागांवरच्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

close