मेटे बंडखोरीच्या पवित्र्यात?

March 14, 2014 11:45 AM0 commentsViews: 3204

vinayak mete14 मार्च :  राष्ट्रवादीचे आमदार विनायक मेटे यांनी पक्षानं दिलेल्या कारणेदाखवा नोटीशीला उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी पक्ष हा छगन भुजबळांच्या दावणीला बांधला आहे अशी कडक टीका त्यांनी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. पक्षासाठी गेली कित्येक वर्ष खस्ता खाल्ल्या, राबराब राबलो त्या कार्यकर्त्याला नोटीस पाठवताना साधं विचारण्यातही आलं नाही. भुजबळांवर टीका करताना अजित पवारांचं मात्र मेटींनी पत्रात कौतुक केलं.

भुजबळांनी मराठा समाजाला फक्त मतांसाठी वापरून घेतलं. मराठा समाजासाठी आरक्षण मागणं हा गुन्हा ठरतो काय असा सवालही मेटे यांनी केला आहे. पक्षाला भुजबळांच्या समता परिषदेचं काम चालतं मात्र माझ काम चालत नाही अशी खंतही त्यांनी या पत्रात व्यक्त केलीय. मेटेंचा बंडखोरीचा पवित्रा काय असल्यानं आता पक्ष त्यावर कुठली भूमिका घेतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, पक्षाच्या विरोधात बोलत राहणं ही मेटेंची सवय आहे अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी आयबीएन लोकमतला दिली आहे. पक्ष त्यांनी दिलेल्या उत्तराचा अभ्यास करेल आणि त्यानंतर कारवाईचा निर्णय होईल असंही ते म्हणाले. लोकशाही पद्धतीनं राष्ट्रवादी पक्ष चालतो तर मेटे हे मराठा समाजाचे एकमेव बडे नेते नाहीत असंही ते म्हणाले.

close