‘आप’च्या कार्यकर्त्या पुष्पा रावत यांच्यावर हल्ला

March 14, 2014 12:13 PM0 commentsViews: 1215
aap su415154545ppor15487874t copy14 मार्च :  मुंबईत आम आदमी पक्षाच्या प्रचारासाठी आलेली दिल्लीतील ‘आप’ची कार्यकर्ती पुष्पा रावत हिच्यावर अज्ञात बाईकस्वराने जीवघेणा हल्ला केला आहे. पुष्पा सकाळी साडेआठच्या सुमारास अंधेरीतील एका मंदिरात दर्शनासाठी जात असताना ही घटना घडली.
हल्लेखोराने पुष्पाच्या मानेवर धारदार ब्लेडने वार करण्याचा प्रयत्न केला.  त्यानंतर पुष्पा रावतला तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तिच्या गळ्यावर ब्लेडचे वार आहेत. मात्र तिची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.
पुष्पा रावत ही रस्त्यावर पथनाट्ये सादर करून आपचा प्रचार करते. यासाठी पुष्पाची टीम दिल्लीतून मुंबईत आम आदमी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी मुंबईत आली आहे.
close