वाकोल्यात ७ मजली इमारत कोसळली, एक ठार

March 14, 2014 2:24 PM0 commentsViews: 1238

vakola14 मार्च :  मुंबईत वाकोल्यातील यशवंतनगर परिसरात एक सात मजली इमारत कोसळली आहे. शुक्रवारी सकाळी या सात मजली इमारतीचा काही भाग ढासळला आणि शेजारच्या झोपडपट्टीवर कोसळला.  मात्र शेजारच्या झोपडपट्टीवर कोसळल्याने ढिगार्‍याखाली काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

या दुर्घटनेत एकाचा बळी गेल्याची माहिती मिळतीये. आतापर्यंत 5 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि रेस्क्यू व्हॅन घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य वेगाने सुरू आहे.

close