पाकिस्तानमध्ये सरकार अखेर झुकलं

March 16, 2009 4:36 AM0 commentsViews: 1

16 मार्च पाकिस्तानमध्ये विरोधकांचा आक्रमक पवित्रा आणि लाँग मार्चला आलेलं देशव्यापी स्वरूप पाहता सरकारला अखेर झुकावं लागलं. इफ्तिकार चौधरी यांच्यासह बडतर्फ न्यायाधीशांची फेरनियुक्ती करण्याचा निर्णय पंतप्रधान गिलानी यांनी घेतलाय. सध्याचे सरन्यायाधीश डोगर यांच्या निवृत्तीनंतर 21 मार्चपासून इफ्तिकार चौधरी सरन्यायाधीश पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. पंतप्रधान गिलानी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंजाबमध्ये लागू करण्यात आलेलं कलम 144 कलम काढण्यात आलं आहे असं सांगितलं. तसंच नवाज शरीफ आणि शाहबाज शरीफ यांना निवडणूक लढवण्यास बंदी घालणा-या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचंही गिलानी यांनी सांगितलं. आंदोलनकर्त्या वकिलांना त्यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलंय. लाँग मार्च दरम्यान अटक करण्यात आलेल्यांची सुटका करण्यात येईल असंही गिलानी यांनी जाहीर केलंय. दरम्यान नवाज शरीफ यांनी लाँगमार्च मागे घेण्यात आला आहे अशी घोषणा केली. पाकिस्तानात रविवारची रात्र अत्यंत वेगवान घडामोडींची ठरली. नवाज शरीफ यांनी पुकारलेल्या लाँग मार्चमध्ये वकील, काही पोलीस अधिकारी सहभागी झाले या लाँग मार्चला देशव्यापी स्वरूप आलं होतं. यापार्श्वभूमीवर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी रात्री पंतप्रधान गिलानी आणि राष्ट्राध्यक्ष झरदारी आणि लष्करप्रमुख कयानी यांची बैठक झाली त्यात वरील निर्णय घेतले गेल्याचं सांगण्यात येतंय.

close