काही चॅनल्स पैसे घेऊन बातम्या दाखवतात, ‘आप’ची आगपाखड

March 14, 2014 3:47 PM6 commentsViews: 1501

aap sanjay sinha ashutosh14 मार्च : आम आदमी पक्षाने आता मीडियावरच निशाणा साधलाय. काही चॅनल्स आमच्या विरोधात सातत्यानं खोट्या आणि चुकीच्या बातम्या देतात. अशा इंडिया टीव्ही, इंडिया न्यूज आणि झी न्यूज या तीन चॅनल्सची आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत, असं पक्षाचे नेते आशुतोष आणि संजय सिंह यांनी जाहीर करून टाकलंय. तर दुसरीकडे खुद्ध अरविंद केजरीवाल यांनी आप सत्तेत आल्यावर पेड मीडियाला जेलमध्ये टाकू असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. पण त्यानंतर त्यांनी घूमजाव केलं.

आपचे नेते अरविंद केजरीवाल यांचा दोनच दिवसांपुर्वी मुंबईत दौरा झालाय. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीत कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे गोंधळ उडाला होता. या गोंधळात वाहतुकीचे नियम आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं. या प्रकरणी केजरीवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र केजरीवाल यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले. आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत मीडियामुळेच गोंधळ झाला. या गोंधळाला मीडियाच जबाबदार आहे असा आरोपच केजरीवाल यांनी केला.

सत्तेत आल्यावर पेड मीडियाला जेलमध्ये टाकू -केजरीवाल

त्यानंतर केजरीवाल नागपूरमध्ये पोहचले. ’10 हजार रुपये भरा आणि केजरीवाल यांच्यासोबत जेवण करा’ हा ‘डिनर विथ केजरीवाल’ निधी संकलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पुन्हा केजरीवाल यांनी मीडियावर निशाणा साधला. खोट्या बातम्या आणि पेड न्यूज दाखवणार्‍या माध्यमांना सत्तेत आल्यास जेलमध्ये टाकू असं वक्तव्य केजरीवाल यांनी केलं. पण केजरीवाल यांच्या विधानामुळे चोहीकडून टीका होऊ लागली त्यामुळे सारवासारव करत आपण तसं म्हणालो नाही असं स्पष्टीकरण केजरीवाल यांनी दिलं.

मात्र ‘आप’ची मीडियावर आगपाखड सुरूच होती. दिल्लीत आपचे नेते आशुतोष आणि संजय सिंह यांनी सयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि तीन वृत्तवाहिन्यांवर थेट आरोप केले. काही चॅनल्स आमच्या विरोधात सातत्यानं खोट्या आणि चुकीच्या बातम्या देतात. अशा इंडिया टीव्ही, इंडिया न्यूज आणि झी न्यूज या तीन चॅनल्सची आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत असं संजय सिंह यांनी स्पष्ट केलं. आणखी एक इंग्रजी चॅनल आमच्या विरोधात आहे असा आरोपही सिंह यांनी केला. या तिन्ही चॅनल्सनी आमच्या विरोधात ज्या काही बातम्या दाखवल्यात त्याचे पुरावे आमच्याकडे हे पुरावे आयोगाकडे देऊ असंही सिंह म्हणाले.

 • Alan

  media hain hi chor

 • Dinesh Magar

  जे चैनल्स या केजरीच्या मनासारख्या / याला पाहिजे तश्या बातम्या दाखवणार नाही ते याच्यासाठी विकाऊ चैनल्स आहेत असे याला वाटते. कारण ते सत्य दाखवतात, म्हणून त्यांना जेलमध्ये टाकणार म्हणे.ज्या मिडीयाने त्याला गरज नसताना अनावश्यक जास्त प्रसिद्धी देऊन हिरो बनवले पण हाच केजरीवाल आता मिडियावाल्यांना जेलमध्ये टाकणार म्हटल्यावर आता तरी मिडीयाने थोडी लाज वाटून किंवा राग येऊन आप च्या (केजरीवालच्या) बातम्या दाखवणे बंद करावे.

 • Sachin

  Media is indeed making mountain out of mole. His statement is clearly about those media houses or media persons who are involved in paid news to be sent to jail. What is wrong with it? Is media above out of rule of law of this country or out of constitution? Mr Wagle also asks question in a wrong manner during discussions, in spite of knowing what Mr Kejriwal said.
  However, one important question to be asked to Mr Kejriwal is what about his post-interview coaxing to the Mr Bajpai (on another TV channel) about running certain part of his interview again and again or removing those statements that may not go down well with audiences. Is this not managing media? What has he to say about it? Also, whatever allegations he makes about anyone, he should substantiate them before being aggressive in commenting about them in front of media.

 • Sachin

  Media is indeed making mountain out of mole. Kejriwal’s statement is clearly about those media houses or media persons who are involved in paid news to be sent to jail. What is wrong with it? Is media above rule of law of this country or above the constitution? Mr Wagle also asks question in a wrong manner during discussions, in spite of knowing what Mr Kejriwal said.

  However, one important question to be asked to Mr Kejriwal is what about his post-interview coaxing to the Mr Bajpai (on another TV channel) about running certain part of his interview again and again or removing those statements that may not go down well. Is this not managing media? What has he to say about it? Also, whatever allegations he makes about anyone, he should substantiate them before being aggressive in commenting about them in front of media.
  It is not just about paid news, there is also money paid to not let any incident published or telecast on TV….a recent hit & run car accident incident in Mumbai…recall what was it..throw more light if you can..

 • Amit Shinkar

  क्रांतिकारी, बहुत हि क्रांतिकारी!!!

 • sharad_kul

  Mr kejariwal is dangerous to our democracy He is terrorist He want create problem before our nation He is talking always false statement He think he is above law and constitution He avoiding any action against his own man (Mr somnath bharati who found gully in inquiry He don’t want apply rule,act against him But other party must follows rules of our nation A common man fade up to his daily statement and charges

close