ममतांना धक्का, अण्णांनी पाठिंबा काढला !

March 14, 2014 5:04 PM0 commentsViews: 2556

23462462mamata and anna14 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा पाठिंबा घेऊन निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली पण आता अण्णा हजारे यांनी पाठिंबा काढून घेत ममतादीदींना धक्का दिलाय. अण्णा हजारे यांनी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना दिलेला पाठिंबा मागे घेतलाय.

माझा पाठिंबा तृणमूल काँग्रेसला नाही तर ममता बॅनर्जी यांना वैयक्तिक पाठिंबा असल्याचं अण्णा हजारे यांनी स्पष्ट केलंय. तसंच देशात स्थिर सरकार यावं म्हणून ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला होता पण संतोष भारतीय यांनी धोका दिल्यामुळे आपण हा निर्णय घेतला असंही अण्णांनी म्हटलंय. ममतांबद्दल आदर आहे पण आता तृणमूलशी संबंध नाही असं अण्णांनी स्पष्ट केलंय.

मागील महिन्यात ममता बॅनर्जी यांनी अण्णांची भेट घेतली. या भेटीतून ममतांना अपेक्षित यश मिळालं. ममतादीदींनी आपल्या 17 मुद्यांना पाठिंबा दिला त्यामुळे आपण त्यांना पाठिंबा देत असल्याचं अण्णांनी जाहीर केलं. एवढेच नाही तर व्यक्ती आणि पक्ष म्हणून पाठिंबा नाही तर देशहिताच्या भूमिकेतून पाठिंबा दिला असंही अण्णांनी जाहीर केलं. पण दोनच दिवसांपुर्वी शक्तीप्रदर्शनासाठी ममतादीदींनी दिल्लीत रामलीला मैदानावर रॅलीचं आयोजन केलं. पण या रॅलीला गर्दीच न जमा झाल्यामुळे अण्णांनी रॅलीला येण्याचं टाळलं. त्यामुळे ममतादीदी चांगल्याच संतापल्या. आपण सगळी कामं सोडून रॅलीसाठी आलो अशी संतप्त प्रतिक्रिया ममतादीदींनी यावेळी दिली. या प्रकारानंतर ममतादीदी आणि अण्णा यांच्यात चर्चाही झाली. पण अण्णांनी आता ‘राजकारणी नकोच’ असं म्हणत आपला पाठिंबाच काढून घेतला. यापुढे कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देणार नाही असं अण्णांनी स्पष्ट केलं.

close