मराठा समाजालाही आरक्षणाची आवश्यकता- पवार

March 16, 2009 5:26 AM0 commentsViews: 1

16 मार्च नगरराष्ट्रवादी काँग्रेसचा महामेळावा नगरमध्ये आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मराठा समाजालाही आरक्षणाची गरज आहे, अशी जाहीर भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आर.आर पाटील होते. तसंच या सभेला उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री जयंत पाटील, अर्थमंत्री दिलीप वळसे पाटील आदी नेते उपस्थित होते. यावेळी आमदार यशवंतराव गडाख यांनी काँग्रेसचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.निवडणुकीपूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मराठा नेत्यांनी पवारांची भेट घेतली. त्यामुळे मराठा समाजातील आर्थिक मागासवर्गीयांना आरक्षण गरजेचं आहे, अशी आरक्षणाविषयीची जाहीर भूमिका पवारांना मांडावी लागली.

close