वाकोला इमारत दुर्घटनेत 7 जण ठार

March 14, 2014 7:17 PM0 commentsViews: 534

43egvakola bulding collaps14 मार्च : मुंबईतील सांताक्रूझ भागात एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झालाय. तर पाच जण जखमी आहे. वाकोला परीसरातली शंकर लोक ही इमारत आज (शुक्रवारी) सकाळी साडे अकराच्या सुमारास अचानक कोसळली.

ही इमारत धोकादायक असल्यामुळे रिकामीच होती पण इमारत पडताना त्याचा काही भाग बाजुच्या बैठ्या चाळीवर पडला यामुळे प्राणहानी झाली. ही इमारत 2007 सालीच रिकामी करण्याचे आदेश मुंबई महानगर पालिकेने दिले होते पण इमारतीतील रहिवाश्यांनी न्यायालयात तक्रार केल्यामुळे ही इमारत आत्तापर्यंत जमीनदोस्त करण्यात आली नव्हती.

आतापर्यंत सात जणांचे मृतदेह सापडलेत, तर अजून 4 जणांचं एक कुटुंब आतच अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आलीये. या दुर्घटनेत सात जणांचे बळी गेल्यामुळे परिसरात शोककळा पसरलीये. मात्र, त्याचवेळी एका दीड महिन्याच्या बाळाचा जीव वाचवण्यात यश आल्यानं समाधान व्यक्त केलं जातंय.

close