गारपीटग्रस्त शेतकर्‍याची आत्महत्या

March 14, 2014 7:37 PM0 commentsViews: 686

dhule farmar14 मार्च : गारपिटीच्या नुकसानीचा धक्का बसल्यानं धुळ्यात सतीश पाटील या तरुण शेतकर्‍यानं आत्महत्या केलीय. कापडणे गावातील ही घटना आहे. सतीश पाटील यांचं टॉमेटो, कोथींबिर आणि मेथीचं पिक या गारपिटीत उद्धस्त झालं. त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या पाटील यांनी शेतातच आत्महत्या केली.

त्यांच्यावर बँकेचं 25 हजारांचं आणि वैयक्तिक 50 हजारांचं असं कर्ज आहे. थकलेलं वीजबिल 58 हजारांच्या घरात गेलंय. त्यांच्या पश्चात पत्नी कविता आणि तीन मुलं आहेत. धुळ्याच्या दौर्‍यावर आलेली केंद्रीय समिती आपल्याला भेट देईल अशी आशा या कुटुंबाला होती. मात्र, समितीच्या दौर्‍यात त्यांची भेट वगळल्यानं नाराजी व्यक्त होतेय.

तर उस्मानाबाद जिल्ह्यात एका शेतकर्‍याने आत्महत्येचा प्रयत्न केलाय. गारपिटीमुळे आमराई आणि ज्वारीच्या पिकाचं नुकसान झाल्याने राजाभाऊ लोमटे या शेतकर्‍याने शेतामध्ये स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. उस्मानाबादमधल्या कळंब तालुक्यातल्या देवळाली गावात ही घटना घडलीये. आत्महत्येच्या प्रयत्नात लोमटे 75 टक्के भाजले, त्यांच्यावर लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

close