गारपीटग्रस्तांसाठी दिल्ली दरबारी 5 हजार कोटींची मागणी

March 14, 2014 7:06 PM0 commentsViews: 482

Image img_212962_cmmeetpm_240x180.jpg14 मार्च : राज्यातल्या गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मदतीसाठी राज्य सरकारने दिल्ली दरबारी दाखल झाले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली. या शिष्टमंडळाने गारपीटग्रस्तांच्या मदतीसाठी पाच हजार कोटी रुपयांची मदत मागितली आहे.

या शिष्टमंडळात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यासह गृहमंत्री आर.आर.पाटील, अनिल देशमुख, आणि, नितीन राऊत यांचा समावेश होता. हेक्टरी 25 हजार ते 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आलीय.

त्याचबरोबर शिष्टमंडळ निवडणूक आयोगालाही भेटण्याची शक्यता आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातील 28 जिल्ह्यांना तडाखा बसलाय. या अस्मानी संकटात 28 जणांचा बळी गेल्या तर 13 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालंय.

close