राष्ट्रवादी भुजबळांच्या दावणीला बांधला -मेटे

March 14, 2014 9:34 PM0 commentsViews: 1701

14 मार्च : राष्ट्रवादीचे नेते विनायक मेटे यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केलीये. छगन भुजबळ यांनी माझ्यावर कारवाई करण्यासाठी पक्षावर दबाव आणला, असा आरोप त्यांनी IBN लोकमतशी बोलताना केला. मी रिसोडमधून निवडणूक लढावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, पण अजून असा काही निर्णय घेतला नाही असं विनायक मेटे यांनी म्हटलंय. दरम्यान, मेटे यांनी पक्षानं दिलेल्या कारणे दाखवा नोटीशीला उत्तर दिलंय. राष्ट्रवादी पक्ष हा छगन भुजबळांच्या दावणीला बांधला आहे अशी कडक टीका त्यांनी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांना पाठवलेल्या पत्रात केलीय. पक्षासाठी गेली कित्येक वर्ष खस्ता खाल्ल्या, राबराब राबलो त्या कार्यकर्त्याला नोटीस पाठवताना साधं विचारण्यातही आलं नाही. भुजबळांवर टीका करताना अजित पवारांचं मात्र मेटेंनी पत्रात कौतुक केलं. भुजबळांनी मराठा समाजाला फक्त मतांसाठी वापरून घेतलं. मराठा समाजासाठी आरक्षण मागणं हा गुन्हा ठरतो काय असा सवालही मेटे यांनी केलाय. पक्षाला भुजबळांच्या समता परिषदेचं काम चालतं मात्र माझ काम चालत नाही अशी खंतही त्यांनी या पत्रात व्यक्त केलीय. मेटेंचा बंडखोरीचा पवित्रा काय असल्यानं आता पक्ष त्यावर कुठली भूमिका घेतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

close