महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 15 कार्यकर्त्यांना अटक : राष्ट्रध्वजावरून वाद पेटला

March 16, 2009 2:44 PM0 commentsViews: 2

16 मार्च, बेळगावप्रकाश बेळगोजीबेळगाव महापालिकेवर तिरंग्यासोबत फडकणारा भगवा झेंडा याच महानगरपालिकेच्या नव्या इमारतीवर लावलाच पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची होती. तर कन्नड ध्वज लावण्याची मागणी कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांची होती. आज सकाळी बेळगाव महानगरपालिकेच्या नव्या इमारतींचं उद्घाटन झालं. त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते बेळगाव महानगरपालिकेच्या नवीन इमारती बाहेर जमले होते. त्यावेळी पुन्हा एकदा राष्ट्रध्वजावरून वाद पेटला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 15 कार्यकर्त्यांना कानडी सरकारच्या पोलिसांनी अटक केली. बेळगाव महापालिकेचं कार्यालय नवीन इमारतीत स्थलांतरीत होताना नवीन इमारतीवर फक्त तिरंगा लावण्याचे आदेश कर्नाटक सरकारनं दिले होते. या आदेशाला कन्नड रक्षक वेदिके प्रमाणं सरकारच्या या निर्णयाला मराठी लोकांनी तीव्र विरोध आहे. पालिका मुख्यालयावर भगवा फडकला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा, मराठी लोकांनी दिला होता. गेल्या 51 वर्षांपासून बेळगाव महापालिकेवर तिरंग्याबरोबर भगवाही फडकतो. पण गेल्या 51 वर्षांची परंपरा आज खंडीत झाली. त्यामुळे सीमाबांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या. दरम्यान, नवीन इमारतीबाहेर मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते जमले होते. त्यावेळी कन्नड रक्षक वेदिका कार्यकर्त्यांचं कन्नड ध्वज लावण्यासाठी आंदोलन सुरू झालं. दरम्यान, भाजपचे खासदार सुरेश आंगडी हे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मोर्चात सहभागी झाल्याने कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी त्यांची प्रतिमा जाळली.सकाळी जेव्हा बेळगावच्या नव्या इमारतींचं उद्घाटन झालं तेव्हा इमारतीवर केवळ तिरंगा फडकत होता. या नव्या इमारतीवरच्या सूचनाही कन्नड भाषेत असून त्यातून मराठीला हद्दपार करण्यात आलं आहे. याविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी नव्या इमारतीसमोर जोरदार आंदोलन केलं. तिरंग्यासोबत भगवा झेंडा लावण्याची मागणी करणा-या सीमाबांधवांना कानडी पोलिसांनी अटक केली. यावेळी कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते जमले होते. नव्या इमारतीवर भगवा झेंडा लावण्यास त्यांचाही विरोध आहे. हे आंदोलन पाहता बेळगावला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं आहे.

close