फिल्म रिव्ह्यु : बेवकुफीयाँ !

March 14, 2014 10:28 PM0 commentsViews: 1965

अमोल परचुरे,समीक्षक

बेवकुफीयाँ..यशराजचा हा सिनेमा बघितल्यावर असं जाणवलं की, बॉलीवूड सिनेमांना सध्या मस्त बहर आलाय. हायवे, क्वीन आणि आता बेवकुफीयाँ…नवे लेखक, नव्या दमाचे दिग्दर्शक आणि त्यांना अनुभवी निर्मात्यांची मिळणारी साथ यामुळे बॉलिवूडमध्ये सध्या चांगल्या सिनेमांची लाटच आली आहे. बेवकुफीयाँ यशराजच्या परंपरेतली टिपिकल लव्हस्टोरी नाहीये, तर आजच्या जमान्याची, आजच्या युथची आणि त्यांच्या प्रॅक्टीकल प्रेमाची गोष्ट आहे. ‘दो दूनी चार’सारखा सिनेमा दिग्दर्शित करणार्‍या हबीब फैजल याने हा सिनेमा लिहीलेला आहे आणि त्याचं दिग्दर्शन केलंय नुपूर अस्थाना या तरुण दिग्दर्शिकेनं.. हबीबने पटकथेवर काम करताना कुठेही मेलोड्रामा येणार नाही याची पुरेपूर काळजी घेतलीये. प्रेमाला पालकांचा विरोध ही बॉलिवूडमध्ये वर्षानुवर्ष चालत आलेली गोष्ट आहे, पण त्यात वेगळे अँगल्स आणून एक फन लव्हिंग कॉमेडी सादर करण्यात आलेली आहे.

काय आहे स्टोरी ?
bewa2-feb23
मोहित चढ्ढा आणि मायरा सहगल हे एकमेकांच्या प्रेमात बुडालेत. अफेअरला दोन वर्ष झाल्यानंतर आता मायराला लग्नाचे वेध लागलेत. मोहित हा एअरलाईन कंपनीत सिनीअर एक्झिक्युटिव्ह आहे तर मायरा एका कॉर्पोरेट कंपनीत मोठ्या पदावर आहे आणि तिचा पगार मोहितपेक्षा जास्त आहे. पण अशा गोष्टींचा कोणताही बाऊ त्यांच्या रिलेशनशिपमध्ये दिसत नाही. मायराचे वडिल म्हणजे व्ही.के.सहगल सरकारी अधिकारी. एकदम कडक शिस्तीचे नसले तरी प्रत्येक गोष्ट तोलूनमापून करण्यावर त्यांचा भर आहे. मोहित अर्थातच त्यांना आवडत नाही, आणि त्यातच रिसेशनमुळे मोहितची नोकरी जाते. ही गोष्ट मायराच्या वडिलांपासून लपवता लपवता भलत्याच गोष्टी घडतात. इथूनच ट्विस्टना सुरुवात होते आणि सिनेमा नेहमीची तीच तीच वाट सोडून वेगळा अनुभव देऊन जातो.

परफॉर्मन्स
bewkuf
सिनेमात महत्त्वाची आहेत तीनच कॅरेक्टर्स..त्यातही अभिनयात बाजी मारलीये अर्थातच ऋषी कपूरने. आयुषमान आणि सोनमची जोडी सिनेमात शोभून दिसते. त्यांच्यातले संवाद खूप नॅचरल आहेत. सिनेमात लेखकाने रिसेशन आणि बेरोजगारीचा मुद्दा खूप सिरीयसली हाताळलाय, त्यामुळे आयुषमानच्या कॅरेक्टरबद्दलल आपोआपच थोडी सहानुभूती तयार होते. तरीही आता आयुषमानने दिल्ली बॉय इमेजमधून थोडं बाहेर पडायची गरज आहे. सिनेमातली दिल्ली, दिल्लीचं नवीन कॉर्पोरेट कल्चर हेसुद्धा खूप मस्त दाखवलंय. सिनेमाचा शेवट अपेक्षित असला तरीही आपण तो एंजॉय करतो हे आणखी एक वैशिष्टय, गाण्यांना मात्र कात्री लावायला हवी होती कारण ती स्पीडब्रेकरसारखी येतात. मीट द पेरेंटस सारख्या हॉलिवूड सिनेमात जेवढी गंमत आहे तेवढी या बेवकुफीयाँमधून मिळत नसली तरी सिनेमा मस्त एंजॉय कराल यात शंका नाही.

रेटिंग – 100 पैकी 75

close