नरेंद्र मोदी वाराणसी तर राजनाथ सिंह लखनौमधून रिंगणात?

March 15, 2014 3:24 PM0 commentsViews: 1262

rajnath sing and modi15 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठीची भाजपची पुढची यादी आज (शनिवारी) जाहीर होण्याची शक्यता आहे. नव्या यादीनुसार वाराणसीतून मुरली मनोहर जोशींऐवजी नरेंद्र मोदी यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. तर पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांना लखनौमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. कलराज मिश्रा आणि नव्यानंच भाजपमध्ये आलेले माजी लष्करप्रमुख जनरल व्ही के सिंग यांनाही तिकीट मिळू शकतं.

पण सूत्रांच्या माहितीनुसार भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये डावललं जात असल्याची भावना आहे. आणि त्यामुळे ते नाराज आहेत. सुषमा स्वराज, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी नाराज असल्याची माहिती मिळतेय. सुषमा स्वराजनी नितीन गडकरींची भेट घेतली.

यावेळी अरुण जेटलीही उपस्थित होते. कर्नाटकमध्ये श्रीरामुलु यांना पक्षात पुन्हा घेतल्यानं सुषमा कमालीच्या नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केलीय. दुसरीकडे, अरुण जेटली यांना अमृतसरमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर अमृतसरचे खासदार नवज्योतसिंग सिद्धु यांनी राज्यसभेची उमेदवारी मागितलीय.

 वाराणसीच का ?

  • - देवळांचं शहर असलेलं वाराणसी ‘हिंदुत्त्वाच्या’ मुद्द्यासाठी योग्य शहर आहे
  • - मोदींनी इथून निवडणूक लढवली तर त्याचा आसपासच्या जागांवरही परिणाम होईल
  • - सध्या भाजपकडे पूर्व उत्तर प्रदेशमधल्या 32 पैकी फक्त 4 जागा आहेत
  • - 1998 मध्ये भाजपला पूर्व उत्तर प्रदेशातून 24 जागा मिळाल्या होत्या.
  • - 1991 पासून 2004 पर्यंत ही जागा भाजपनेच जिंकलेली आहे
  • - 2009 मध्येही ही जागा भाजपने जिंकली
  • - मुरली मनोहर जोशी याच मतदारसंघातून निवडून आलेले आहेत

close