ठाण्यात मनसेकडून अभिजीत पानसे रिंगणात

March 15, 2014 4:47 PM0 commentsViews: 1707
 ठाण्यात मनसेकडून अभिजीत पानसे रिंगणात

ठाण्यात मनसेकडून अभिजीत पानसे रिंगणात

15 मार्च : शिवबंधनाचा धागा तोडून मनसेत दाखल झालेले अभिजीत पानसे आता थेट मनसेकडून लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. मनसेनं आपली दुसरी यादी जाहीर केलीय या यादीत अभिजीत पानसे यांना ठाण्यातून उमेदवारी देण्यात आलीय. तर सुरेश म्हात्रे यांना भिवंडीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहेत.

ठाण्यातून शिवसेनेनं राजन विचारे यांना उमेदवारी दिलीय तर राष्ट्रवादीकडून संजीव नाईक यांना उमेदवारी दिलीय त्यामुळे इथं मनसेनं ठाण्यातून अभिजीत पानसे यांना उमेदवारी देऊन सेनेच्या विरोधात दंड थोपडले आहे.

तर मनसेचे दुसरे उमेदवार सुरेश म्हात्रे यांना भिवंडीतून उमेदवारी देण्यात आलीय. भिवंडीची जागा सेनेनं भाजपला दिलीय. पण भाजपने आपला उमेदवार अजून जाहीर केलेला नाही.

विशेष म्हणजे मनसेनं आपल्या वर्धापन दिनानिमित्तच्या कार्यक्रमात सात उमेदवारांची यादी जाहीर केली होती. या सात उमेदवारांपैकी सहा उमेदवार हे शिवसेनेच्याच विरोधात आहे. आणि आता ठाण्यात पानसे यांना उमेदवारी देऊन आणखी भर घातलीय.

अशी आहे मनसेची 1 यादी

  • दक्षिण मुंबई      – बाळा नांदगावकर
  • दक्षिण मध्य मुंबई – आदित्य शिरोडकर
  • उत्तर पश्चिम मुंबई  – महेश मांजरेकर
  • कल्याण          – राजीव पाटील
  • शिरूर           – अशोक खंडेभराड
  • नाशिक          – डॉ. प्रदीप पवार
  • पुणे             – दिपक पायगुडे

 

मनसेची 2 यादी

  • ठाणे –  अभिजीत पानसे
  • भिवंडी -सुरेश म्हात्रे
close