अधिवेशनात विरोधकांचा आक्रमक पवित्रा

March 16, 2009 4:55 AM0 commentsViews: 1

16 मार्च निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य विधीमंडळाचं लेखानुदान अधिवेशन सुरू होतंय. चार दिवस चालणा-या या अधिवेशनात पुढच्या तीन महिन्यांच्या सरकारी खर्चाचं लेखानुदान सादर करण्यात येणार आहे. या अधिवेशनात अनेक महत्त्वाची शासकीय आणि अशासकीय विधेयकं मांडण्यात येणार आहेत. अधिवेशनादरम्यान प्रश्नत्तोतराचे तास ठेवण्यात आले नसले तरी महत्त्वाच्या लक्षवेधीं सूचनांवर दोन्ही सभागृहामंध्ये चर्चा होणार आहे. सत्ताधारी आणि विरोधकांसह सर्वच पक्षाचे आमदार निवडणुकांच्या कामात गुंतले असल्यानं उपस्थिती पुरेशी असेल की नाही याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान विरोधकांनी मुख्यमंत्राच्या चहापानावर बहिष्कार घालून आधीच नकारघंटा वाजवली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधा-यांची कोंडी करून सरकारच्या कारभारावर हल्ले करण्याचा आक्रमक पवित्रा विरोधकांनी घेतला आहे. शेतक-यांच्या आत्महत्या, कायदा सुव्यवस्था,बेरोजगारी आदी प्रश्नांवर सरकार अपयशी ठरल्याचा आरोप विरोधी पक्षातर्फे करण्यात आला आहे.

close