बेपत्ता मलेशियन विमानाचं अपहरण ?

March 15, 2014 2:21 PM0 commentsViews: 4429
बेपत्ता मलेशियन विमानाचं अपहरण ?

बेपत्ता मलेशियन विमानाचं अपहरण ?

15 मार्च : मलेशियन एअऱलाईन्सचं विमान बेपत्ता झाल्याला आता 8 दिवस झाले आहेत आणि या विमानाचं अपहरण झालं असावं असा निष्कर्ष मलेशनयन सरकारच्या तपास यंत्रणांनी काढलाय.

विमान उडवण्याचा अनुभव असणार्‍या एक किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी विमानाचं अपहरण केलं आणि त्यानंतर विमानातल्या संपर्क यंत्रणा बंद केल्या. आणि विमान ठरलेल्या मार्गापेक्षा दुसरीकडे नेलं असा निष्कर्ष मलेशियन सरकारने काढलाय. इलेक्ट्रॉनिक आणि सॅटलाईट माहितीच्या आधारे आता हे विमान बंगालच्या उपसागरात किंवा हिंदी महासागरात कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. अमेरिकन सरकार आणि मलेशियन सरकारने हा अंदाज व्यक्त केलाय.

मागील आठवड्यात शनिवारी साडेबारा वाजता मलेशियन एअरलाईन्सचे बोईंग श्रेणीतील या प्रवासी विमानाने क्वाललांपूर येथून बिजिंगसाठी 12 कर्मचार्‍यांसह 227 प्रवाशांना घेऊन उड्डाण केलं होतं. यात 5 भारतीय प्रवाशांचा समावेश आहे. आता या विमानाला शोधण्यासाठीचे प्रयत्न आणखीन वाढवणार असल्याचं चीनने म्हटलंय. तर तर भारत अंदाम निकोबार बेटांजवळ शोध घेतला जात आहे. या शोधात आता अमेरिकन अंतराळ संस्था नासाही सामील झालेली आहे.

close