मराठवाड्यात 30 तासांत चार शेतकर्‍यांच्या आत्महत्या

March 15, 2014 11:22 PM2 commentsViews: 883

234marathvada_farmar15 मार्च : अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसलेल्या मराठवाड्यातला शेतकरी हतबल झालाय. गेल्या 30 तासांत मराठवाड्यात 4 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यात. नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातल्या सांतुका गारोळे या शेतकर्‍यानं विष घेवून आत्महत्या केली.

लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ येथील भागवत माने या शेतकर्‍यानंही विष घेऊन आपलं आयुष्य संपवलं. बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यातील महादेव शेळके या अवघ्या 20 वर्षीय शेतकर्‍यानं आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. महादेव यांनी गळफास घेवून आत्महत्या केली. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातल्या बालाजी बागल या शेतकर्‍याचं ज्वारीचं अतोनात नुकसान झालं. त्यामुळे निराश झालेल्या बागलनं जीव संपवला.

गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीमुळे नांदेड जिल्ह्यातल्या गोलेगावमधल्या संतुका गारुळे या शेतकर्‍यानं आत्महत्या केलीय. संतुका गारुळे यांनी यंदाच्या रब्बी हंगामाच्या बियांणासाठी कर्ज घेतलं होतं. पण गारपीटात गारुळे यांच्या शेतीचं मोठं नुकसान झालंय. यामुळे आता हे कर्ज फेडताच येणार नाही, या चिंतेपोटी गारुळे यांनी विष घेऊन आत्महत्या केली. पिकांच्या भरवश्यावर शेतकर्‍यांनी अनेक योजना आखल्या होत्या.

पण अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यात हातचं पीक वाया गेलं. त्यातच सरकारकडून अजून मदतीची घोषणाही झालेली नाही. त्या एका रात्रीतून शेतीमधील पीक गारपीठीनं होत्याचं नव्हते झाले. मराठवाड्यातील शेतकर्‍यांच्या भविष्यातील योजना गारपिटीनं उध्वस्त झाल्यानं आता शेतकर्‍यांनी आपलं जीवन संपवायला सुरूवात केली. आता तरी प्रशासकीय सोपस्कर बाजूला ठेवून लवकरात लवकर शेतकर्‍यांच्या हातात मदत पोहचली पाहिजे नाहीतर शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा आकडा वाढत जाईल.

 • krishna

  Kay karavt samjat nahi amchvar marnach val ali ani lok election var concentrate kart ahet

 • mvkapuskari


  निवडणुकीच्या रणधुमाळीत दंग झालेल्या उमेदवार आणि सत्तेवर असलेल्या राजकीय
  नेत्यांना कळकळीची विनंती आहे कि आजही चालूच असलेल्या गारपीट आणि पाउस
  यांच्या अवकाळी मारयामुळे निष्प्राण आणि गलितगात्र झालेल्या या दुर्बल आणि
  हतबल शेतकर्याकडेही ​जरा एक नजर पहा आणि नंतर निवडणुकीकडे पहा शेवटी तोच मतदार आहे.

close