लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढवणार – मायावती

March 16, 2009 5:18 AM0 commentsViews:

16 मार्च दिल्लीलोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मायवतींनी रविवारी दिल्लीत तिस-या आघाडीतील नेत्यांसाठी डिनर पार्टी आयोजित केली होती. यावेळी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा करणा-या मायावतींनी पंतप्रधान होण्याची इच्छा व्यक्त केली. तसंच तिस-या आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस आणि भाजपला शह देण्याचा त्यांचा इरादा आहे. या पार्टीला एचडी देवेगौडा, चंद्राबाबू नायडू, तेलंगणा राष्ट्र समितीचे, के. चंद्रशेखर राव आणि बिजू जनता दलाचे खासदार जय पांडा तसंच प्रकाश करात, ए.बी.बर्धन तसंच डी. राजा हे डाव्या पक्षांचे नेतेही उपस्थित होते. मात्र जयललिता यांच्या एआयएडीमकेचा एकही प्रतिनिधी यावेळी उपस्थित नव्हता. यावेळी तिस-या आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार निवडणुकीनंतरच ठरवला जाईल असं सीपीएम आणि बिजेडीच्या नेत्यांनी स्पष्ट केलं.

close