दिल्ली गँगरेप : दोघांच्या फाशीवर कोर्टाची 31 मार्चपर्यंत स्थगिती

March 15, 2014 9:47 PM0 commentsViews: 232

Image img_226832_delhigangrapearrest_240x180.jpg15 मार्च : देशाला हादरावून सोडणार्‍या दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोन नराधमांच्या फाशीला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलीय. पवन आणि मुकेश या दोषींच्या फाशीला 31 मार्चपर्यंत कोर्टाने स्थगिती दिलीय.

दोनच दिवसांपुर्वी या प्रकरणी चारही दोषींना फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली होती. बलात्कार आणि हत्ये प्रकरणी दुर्मिळातील दुर्मिळ खटला नमूद करत ट्रायल कोर्टाने आरोपी मुकेश, अक्षय ठाकूर, पवन गुप्ता आणि विनय शर्माला फाशीची शिक्षा सुनावली होती.

16 डिसेंबर 2012 रोजी राजधानी दिल्लीत धावत्या बसमध्ये सहा जणांनी एका 23 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता. तसंच पीडित तरुणीला आणि तिच्या मित्राला अमानुष मारहाण केली होती या मारहाणीमुळे या तरुणीचा 11 दिवसांनंतर मृत्यू झाला होता. सहा आरोपींपैकी एक आरोपी रामलालने तिहार तुरूंगात आत्महत्या केली तर एकजण अल्पवयीन सिद्ध झाला.

त्यामुळे चारही आरोपींवर बलात्कार, खून, लूटमार, अनैसर्गिक गुन्हा असे एकूण 13 आरोप सिद्ध झाले. या चारही नराधमांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. ती हायकोर्टाने कायम ठेवली पण या निर्णयाविरोधात आरोपींनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली या प्रकरणी आता सुप्रीम कोर्टाने दोन जणांच्या फाशीवर स्थगिती आणलीय.

close