‘आप’ने आरोप सिद्ध केले तर लोकसभेतून माघार घेईन -मुत्तेमवार

March 15, 2014 10:39 PM0 commentsViews: 991

mutem var15 मार्च : आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आरोप सिद्ध करून दाखवावे असं जाहीर आव्हान काँग्रेसचे खासदार विलास मुत्तेमवार यांनी केलं.

तसंच जर केजरीवाल यांनी आरोप सिद्ध करुन दाखवले तर नागपुरमधून लोकसभेची निवडणूक लढवणार नाही असंही मुत्तेमवार यांनी जाहीर केलंय. नागपूरच्या दौर्‍यावर असताना केजरीवाल यांनी विलास मुत्तेमवार आणि नितन गडकरी यांची मिहानमधील एका कंपनीत भागीदारी असल्याचा आरोप केला होता.

आपण 21 तारखेला लोकसभेच्या निवडणुकीचा अर्ज दाखल करणार आहोत त्याआधी केजरीवाल यांनी या आरोपासंदर्भात पुरावे सादर करावेत. नाहीतर आपण निवडणूक आयोग आणि कोर्टात यासंदर्भात दाद मागणार असल्याचेही मुत्तेमवार यांनी सांगितलंय.

close