नरेंद्र मोदी वाराणसीतून निवडणूक लढवणार

March 15, 2014 11:31 PM4 commentsViews: 983

modi_rajnath15 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी वाराणसीतून रिंगणात उतरणार यावर अखेर शिक्कामोर्तब झालंय. मोदी वाराणसीतून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह लखनौमधून निवडणूक लढवणार आहे.

भाजपने उशिरा रात्री पत्रकार परिषद घेऊन 55 उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. मोदींसाठी वाराणसीची जागा सोडणारे मुरली मनोहर जोशी कानपूरमधून निवडणूक लढवणार आहे. तर अरूण जेटली अमृतसरमधून निवडणूक लढवणार आहे. तर दिल्लीत विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार हर्ष वर्धन यांना उमेदवारी देण्यात आलीय.

हर्ष वर्धन चांदणी चौकमधून निवडणूक लढवणार आहे. तर सुल्तानपूरमधून वरुण गांधी, पीलीभितमधून मेनका गांधी तर उमा भारती झांसीमधून निवडणूक लढवणार आहे. तसंच खाकी वर्दी सोडून खादी वर्दीसाठी पोलीस आयुक्तपद सोडणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांना उत्तर प्रदेशच्या बागपतमधून उमेदवारी जाहीर झालीय. आणि अभिनेत्री किरण खेर चंदीगडमधून उमेदवारी देण्यात आलीय.

मोदींसाठी वाराणसीच का ?

 • - देवळांचं शहर असलेलं वाराणसी ‘हिंदुत्त्वाच्या’ मुद्द्यासाठी योग्य शहर आहे
 • - मोदींनी इथून निवडणूक लढवली तर त्याचा आसपासच्या जागांवरही परिणाम होईल
 • - सध्या भाजपकडे पूर्व उत्तर प्रदेशमधल्या 32 पैकी फक्त 4 जागा आहेत
 • - 1998 मध्ये भाजपला पूर्व उत्तर प्रदेशातून 24 जागा मिळाल्या होत्या.
 • - 1991 पासून 2004 पर्यंत ही जागा भाजपनेच जिंकलेली आहे
 • - 2009 मध्येही ही जागा भाजपने जिंकली
 • - मुरली मनोहर जोशी याच मतदारसंघातून निवडून आलेले आहेत

 

 • aazaad hindustaani

  केजरीवाल सारखा नि पक्षपाती आणि जनसेवेने झपाटलेला माणूस आपण आजवर पाहिलेला नाही.त्याचा हा खटाटोप केवळ भ्रष्ट्राचार नाहीसा करण्यासाठी आहे.आपला त्यांना पूर्ण पाठींबा असून अशा माणसास शतश शुभेच्या.जन लोकपाल आलेच पाहिजे भ्रष्टाचार नाहीसा झालाच पाहिजे.

 • aazaad hindustaani

  केजरीवाल हे कसे हि असले तरी त्यंचा प्रयत्न चांगल्या कारणासाठी आहे, हे फक्त एक सामान्य माणूसच समजू शकतो. जेह्वा आपण एखाद्या सरकारी कार्यालयात जातो आणि छोट्या कामासाठी ५ चकरा मारतो आणि शेवटी तो सरकारी कर्मचारी पैसे मागतो, तेवा खरच वाटे कि जनलोकापाल पाहिजे होता.

 • aazaad hindustaani

  एक गोष्ट मान्य करावी लागेल कि केजरीवाल खूप हुशार माणूस आहे आणि आपणा सर्वांसाठी लढतोय. जे संविधान आणि जी घटना जनतेसाठी लिहिली गेली तिची ह्या प्रतिष्ठित राजकारण्यांनी स्वताच्या फायद्यासाठी किती वाट लावली आहे हे तुम्हा आम्हाला श्रीमंत आणि गरिबा मधल्या फरकाने स्पष्ट दिसतंय. आता सामान्य माणूस जागा होतोय. आम्ही केजरीवालच्या मागे उभे आहोत.

 • Amit Shinkar

  पोर्न धंदा आणि भर रात्री विदेशी महिलांना मारहाण करणाऱ्या सोमनाथ भारतीला कायदामंत्री करणारे आणि पाठींबा देणारे महान केजरीवाल… क्रांतिकारी, फारच क्रांतिकारी!!!

close